आगीत सीरमचे एक हजार कोटींचे नुकसान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आग लागलेल्या भागाची पाहणी केली. या आगीत सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आदर पूनावाला यांनी या वेळी दिली. कोरोनावरील कोविशिल्ड लस उत्पादनावर या आगीचा परिणाम होणार नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले..